• Facebook
  • Twitter
  • Instagram

स्पर्धेची नियमावली | फॉर्म

‘जाणीव’ व ‘दैनिक वृत्तमानस’ आयोजित

माझा बाप्पा

घरगुती गणेश दर्शन स्पर्धा - २०२१

कोविड-१९ बाबतच्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सामाजिक विषयांवरील ONLINE स्पर्धा

विघ्नहर्ता श्री गणेश हे आपणां सर्वांचंच आराध्यदैवत. श्री गणेशाच्या आगमनाचा मनोभावे उत्सव करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्त सदैव उत्साहानं तयार असतो.

गेले सुमारे दीडेक वर्षं आपण सर्वच जण कोरोनाच्या गडद छायेखाली वावरत आहोत. पण या परिस्थितीतही विघ्नहर्ता श्री बाप्पा सर्वांनाच बळ देत आपणां सर्वांच्या पाठीशी आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवाचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि घराघरामध्ये चैतन्याचे अधिक उत्साहपूर्ण वातावरण तयार व्हावे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून ‘जाणीव, मुंबई’ आणि ‘दैनिक वृत्तमानस’ यांच्या वतीने जगभरातल्या गणेशभक्तांसाठी ऑनलाईन माझा बाप्पा घरगुती गणेश दर्शन स्पर्धा-२०२१ आयोजित करण्यात येत आहे. पर्यावरण, पाणी हेच जीवन, कोरोनामुक्त घर, ग्लोबल वॉर्मिंग या सामाजिक विषयांना प्राधान्य देणार्‍या या स्पर्धेमध्ये गणेशभक्तांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे.

: स्पर्धेची नियमावली :

१) संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणारी स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात येईल. 

अ)  मुंबई व उपनगरांतील एकूण ६ लोकसभा मतदारसंघ व त्याअंतर्गत येणारे एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ

ब) उर्वरित महाराष्ट्र (मुंबई व उपनगर क्षेत्र वगळून)

क) अ-निवासी भारतीय (NRI)

२) मुंबई व उपनगर गटाची स्पर्धा प्राथमिक, अंतिम व महाअंतिम अशा तीन स्तरांवर होईल.

३) उर्वरित महाराष्ट्र आणि अ-निवासी भारतीय गटासाठी थेट प्रत्येकी एकच फेरी असेल. 

४) पर्यावरण, पाणी हेच जीवन, कोरोनामुक्त घर, ग्लोबल वॉर्मिंग या सामाजिक विषयांवरील मूर्ती व सजावटीला या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

विषयांबाबत स्पष्टीकरण : गणेशमूर्ती शाडू, कागदी लगदा वा तत्सम घटकांपासून तयार केलेली असल्यास पर्यावरण विषयामध्ये या मूर्तीचा सामावेश होऊ शकतो. अन्य विषयांची मांडणी गणेशमूर्तीभोवती असलेल्या सजावटीमध्ये करता येऊ शकेल. या विषयांवरील कविता, अन्य लेखन सजावटीमध्ये असेल, तरीही त्या मांडणीचा या स्पर्धेसाठी विचार करण्यात येईल. अर्थात त्यातील कलात्मकतेला प्राधान्य असेलच.

५) स्पर्धक दिनांक १ सप्टेंबरपासून www.mazabappa.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज भरुन या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.

६) आपल्या घरामध्ये विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर २१ सप्टेंबरपर्यंत स्पर्धकाने गणेश मूर्ती व सजावट यांचे हाय-रिझोल्यूशनमधील छायाचित्र काढावे आणि mazabappacontest@gmail.com वर मेल करावे. मोबाईलमधून छायाचित्र काढत असल्यास तो आडवा धरुन उत्तम प्रतीचे (हाय-रेझोल्युशन) छायाचित्र येईल, याची काळजी घ्यावी.

७) स्पर्धकांनी दोन छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे. अ) गणेश मूर्ती व सजावटीसह  ब) गणेशमूर्तीसहित स्वतःच्या कुटुंबियांसह / गणेश मूर्तीसह सेल्फी.

८) वरीलप्रमाणे दोन छायाचित्रांसहित तुम्ही सादर केलेल्या विषयांच्या अनुषंगाने ४ ते ६ ओळींमध्ये एक टिपण सोबत जोडावे.

९) सदर स्पर्धेचा ऑनलाईन अर्ज भरतेवेळी नोंदणी केलेले नाव, मोबाईल क्रमांक मेलच्या सब्जेक्टमध्ये नमूद करावे. ऑनलाईन अर्जातील तपशील व छायाचित्र पाठवतानाचे तपशील एकच असल्याची खात्री करुन घ्यावी व त्यानंतरच छायाचित्र पाठवावे. छायाचित्राची फाईलही ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेले नाव व मोबाईल क्रमांक टाकून सेव्ह करावी. उदा. तुमचे नाव (मोबाइल क्रमांक)

१०) स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

११) स्पर्धेसाठी मान्यवर परीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल व परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

१२) अंतिम व महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभाबद्दल तात्कालिक परिस्थिती व शासनाच्या आदेशांनुसार निर्णय घेतला जाईल व त्याप्रमाणे स्पर्धकांना/विजेत्यांना कळवण्यात येईल.

१३) उर्वरित महाराष्ट्र आणि अ-निवासी भारतीय गटातील विजेत्यांना त्यांची पारितोषिके पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.

१४) दरम्यानच्या काळात, कोरोनापरिस्थितीमुळे शासनाने जारी केलेले निर्बंध शिथील झाल्यास व शासनाकडून परवानगी मिळाल्यास अशा जाहीर कार्यक्रमांबाबतच्या तत्कालीन नियमांचे योग्य प्रकारे पालन करुन अंतिम फेरी व महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ प्रत्यक्ष रंगमंचावर तसेच स्पर्धकांच्या व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येईल. अन्यथा, शासनाच्या नियमांनुसार मर्यादित संख्या असलेल्या निमंत्रित प्रेक्षकांसमोर सर्व शासकीय नियमांचे पालन करुन अंतिम व महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम केला जाईल आणि त्याचे चित्रीकरण करुन ते ऑनलाईन प्रसारीत केले जाईल.

१५) स्पर्धेबाबत काही शंका असल्यास ८९७६२१७७७३ (अनिता) यांच्याशी संपर्क साधावा.

माझा बाप्पा घरगुती गणेश दर्शन स्पर्धा २०२१ मध्ये आपण सर्व गणेशभक्त बहुसंख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराल, याची खात्री वाटते.

धन्यवाद!

खालील अर्ज पूर्ण भरून सबमीट करावा.

MAZA BAPPA

Household Ganesh Darshan Contest 2021

(Based on Social theme)

Organized by Janeev Trust, Mumbai & Daily Vruttamanas

Grand Online Contest following the preventives of Covid-19

Bappa! Our favorite Lord Ganesha is arriving! The festival that we keep waiting for a year is approaching round the corner. Since last one and half year, we are missing the soul of every festival. Every Ganesh devotee is wishing those carefree days to come back. Corona is standing between us and our devotion. But Ganesha is not just a lifeless idol. He is our father, who protects his family. Believing his presence with us all forever, we wish to bring those beautiful days back. We wish every house be filled with joy and enthusiasm.

Therefore, we are here with Worldwide MAZA BAPPA household Ganesh Darshan Contest-2021.

              The brain behind the concept is honorable Ex-Central Minister and M.P of Shivsena, Shri. Arvind Sawant. ‘Janeev, Mumbai’ and ‘Daily Vruttamanas’ have joined together to back the thought! The idea behind the contest is to invoke social awareness and give voice to the problems relating with the environment. The contestants are expected to participate putting their focus on the themes like, ‘Environment’ ‘Water is Life’, ‘Corona-free house’, Global warming!

 

: Rules of the Contest :

1) This contest is entirely ONLINE & will be held within THREE categories.

         A) Mumbai & Suburbia (Six Parliament Constituencies and the 36 Legislative Assembly sections that constitute under them)

         B) Rest of Maharashtra (Excluding Mumbai & Suburbia)

         C) Non-Residential Indians (NRI)

2) The category 'A' will be held on three levels, i.e. Preliminary, Final & Grand Finale.

 

3) There will be ONLY ONE ROUND for Rest of Maharashtra category & Non-Residential Indians category each. 

4) The decoration that gives voice to a social problem like Environment, Water is Life, Corona-free Home, Global Warming will be given precedence.

About subjects: You can participate under an Environment category, if your Ganesh idol is made up of Shadu or paper pulp or any eco-friendly material (not made up of Plaster of paris). For rest of the subjects, you can participate if you decorate around your Ganesh idol with the particular subject. Any poem, article, extract from any literature or information regarding the subject will be considered to constitute particular subject from the list. Artistic expression of the subject will be given precedence.

5) Those who want to participate can fill up Online Registration Form on our website www.mazabappa.in from September 1st, 2021.

6) Once you installed your Ganesh idol & the decoration around it, take a high resolution photograph of it & mail it on mazabappacontest@gmail.com If you are taking this photograph from your mobile, please make sure for high resolution picture, holding the device horizontal. You can submit your entry till September, 21st, 2021, along with fully filled online form & photograph.

7) Contestants should mail TWO PHOTOGRAPHS. a) Ganesh idol with decoration around, b) Family Picture / Selfie with Ganesh idol

8) Along with photographs, please attach a brief note in 4 to 6 lines about the subject you have decorated with.

9) Please mention the same name & mobile number in E-mail subject which you have mentioned in Online Registration Form. Also, please make sure that details from Online Registration Form & E-mail to which photograph is attached are same. Please save your photograph with the same name & mobile number from Online Registration Form i.e. Your Name (Mobile number)

10) No Entry fees for participating in the contest.

11) Eminent Juries will be appointed for the contest and their decision will be final.

12) The decision about the prize distribution ceremony of final and grand final rounds will be taken according to the topical condition and the directives of the Government and the contestants will be informed accordingly.

13) The winners from Category B & C will get their prizes directly.

14) Meanwhile, if the restrictions imposed on, during Corona situation get lifted or relaxed, with the permission of the Government, we would like the ceremony to take place ‘live’ in the presence of the participants and the viewers, following all the preventives put on by the Government. The ceremony will be filmed and broadcasted online.

15) Call 8976217773 (Anita) for enquiry or query, if any.

I am sure; majority of the devotees of Lord Ganesha would participate in the contest MAZA BAPPA Household Ganesh Darshan Contest 2021 and help us succeed in bringing all together.

Thanks.

Please fill the form given below & submit it.

" माझा बाप्पा " घरगुती गणेश दर्शन स्पर्धा - २०२१

 

MAZA BAPPA Household Ganesh Darshan Contest - 2021

ऑनलाईन सहभाग नोंदणी  |  ONLINE REGISTRATION

गट / Category
विषय | Subject

Step 1. Registration Through Form Filling (From 1st September 2021.)

Step 2. Contestants should mail TWO PHOTOGRAPHS. a) Ganesh idol with decoration around, b) Family Picture / Selfie with Ganesh idol on mazabappacontest@gmail.com (From 9th September to 21st September 2021.)

Step १ : फॉर्म भरण्याद्वारे नोंदणी चरण (१ सप्टेंबर २०२१)

Step २. स्पर्धकांनी दोन छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे. अ) गणेश मूर्ती व सजावटीसह  ब) गणेशमूर्तीसहित स्वतःच्या कुटुंबियांसह / गणेश मूर्तीसह सेल्फी. mazabappacontest@gmail.com वर मेल करा (९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत.)